Public holiday : – शासनाने सन २०२३ सालासाठी राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्टया परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) कलम २५ करिता अधिसूचना क्र.सार्वसु ११२२/ प्र.क्र. ११७/कार्या- २९ दि. ०२ डिसेंबर २०२२ अन्वये अधिसूचित केल्या आहेत.
जॉईन व्हॉट्सॲप गृप 👉 |
सार्वजनिक सुट्टी यादी
सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी “अनंत चतुर्दशी” या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे.
आता सन २०२३ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना याद्वारे खालीलप्रमाणे तिसरी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.
Public Holidays in Maharashtra
सुट्टीची बाब -इंग्रजी तारीख ०६ डिसेंबर, २०२३ (वार बुधवार) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
सदरील आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.
स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी. अॅन्ड एस. नंबर पी-१३/۱۱/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे.
सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१२०५१५३३३५८६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.