Close Visit Mhshetkari

Banks FD Rates : मोठी बातमी… आता 3 वर्षांच्या एफडीवर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर, SFB ची ग्राहकांना मोठी ऑफर

Banks FD Rates : सध्या गुंतवणुकीचे विविध पर्याय असतानाही लोक एफडीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. आपण अशाच स्मॉल सेव्हिंग बँक बचत योजना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.जिथे इतर बँकांच्या तुलनेत ग्राहकांना एफडीवर जास्त व्याज दिले जाते.

साधारणपणे 3 वर्षांपर्यंत एफडीमध्ये पैसे गुंतवल्यास 8 % पेक्षा जास्त व्याज मिळत आहे. BankBazaar च्या आधारे ही लिस्ट तयार करण्यात आली आहे.

Small Finance Banks FD Rates

सूर्योदय स्मॉल फायन्स बँक ३ वर्षांच्या बँक एफडी वर ग्राहकांना 8.60 % व्याज देते.एक लाख रुपयांची तीन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीनंतर ग्राहकांना 1.29 लाख रुपये मिळतात.

जन स्मॉल फायन्स बँक आणि उत्कर्ष स्मॉल फायन्स बँक 3 वर्षांच्या एफडीवर 8.50 % व्याजदर मिळते. 1 लाख रुपये 3 वर्षांसाठी गुंतवल्यास मॅच्युरिटीनंतर ग्राहकांना 1.29 लाख रुपये परतावा मिळतो.

हे पण वाचा ~  Fixed Deposit : Bank FD मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या तोटे, वेळीच घ्या समजून; अन्यथा होईल नुकसान !

फिनकेयर स्मॉल फायन्स बँक 3 वर्षांच्या FD वर 8.1 % व्याज देते. सदारील बँकेत 1 लाख रुपये 3 वर्षांसाठी गुंतवले तर 1.27 लाख रुपये परतावा मिळतो.

स्मॉल फान्स बँक ग्राहकांना 3 वर्षांच्या फिक्स deposite साठी 8 % व्याज देते आहे. तीन वर्षांपर्यंत या बँकेत 1 लाख रुपये गुंतवल्यास 1.27 लाख रुपये परतावा मिळेल.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फान्स बँक 3 वर्षांच्या FD वर 7.75 % व्याजदर देते. 1 लाख रुपये 3 वर्षांसाठी गुंतवल्यास 1.26 लाख रुपये मिळतील.

Leave a Comment