PF New rule : नमस्कार मित्रांनो पीपीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी खातेदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मॅच्युरिटी संदर्भात नवीन नियम मोदी सरकारने बनवलेले आहेत तर बघूया काय आहेत, नवीन अपडेट्स
Provident Fund new rule
भविष्य निर्वाह निधी संदर्भातील नवीन नियमांमध्ये वाढीव कालावधीसाठी पीएफ अकाउंट खाते बंद करणाऱ्यांसाठी दिलासा देण्यात येणार आहे सदरील नियम 9 नोव्हेंबर 2023 पासून लागू करण्यात आलेला असून याला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (सुधारणा) योजना २०२३ असे नाव देण्यात आले आहे.
मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पीपीएफ खाते पंधरा वर्षे पूर्ण झाल्या पूर्वी बंद केल्यास यावर मोठा दंड आकारला जातो, परंतु खातं कालावधी वाढवण्याबाबत संभ्रम होता. जुन्या नियमांनुसार (PPF 2019), जर एखाद्यानं वाढीव कालावधीत खाते बंद केलं तर खात्याचा कालावधी वाढवल्यापासून दंड भरावा लागत होता.
खाते बंद करण्याबरोबरच कालावधी वाढवण्यासाठी सुद्धा दंड भरावा लागत असे, एखाद्या खातेदाराने पंधरा वर्षानंतर पाच वर्षापेक्षा अधिक काळ पीपीएफ खाते कालावधी वाढवला तर पीपीएफ खातं पहिल्यांदा वाढवल्यापासून दंड आकारला जायचा.
नव्या नियमांत काय?
नवनवीन नियमांमध्ये अशा स्पष्ट करण्यात आले आहे जर गुंतवणूकदाराने प्रत्येकी पाच वर्षासाठी त्याच्या कालावधी तीन वेळा वाढवला असेल तर त्याला प्रथम खात्याचा कालावधी वाढल्यापासून 1 % दंड आकारल्या जाणार नाही.
पण जर ज्या पाच वर्षांमध्ये खाते मुदतपूर्व बंद करण्यासाठी अर्ज करण्यात आला असेल तर पाच वर्षासाठीच तो घडला जाईल कपातनियमांनुसार, मॅच्युरिटी कालावधीपूर्वी खाते बंद केल्यास, व्याजात 1 % कपात केली जाते, जी खातं उघडल्याच्या तारखेपासून लागू होते.
जर एखाद्या व्यक्तीला चालू योगदानावर 7.1 % व्याज मिळत असेल, परंतु जर त्याने खाते वेळेपूर्वी बंद केले तर त्याला फक्त 6.1 % नुसार व्याज मिळेल.या परिस्थितीत खातं बंद करण्याची सूट असणार आहे.
How to close pf account
- खातेदार किंवा कुटुंबातील सदस्यांच्या गंभीर आजाराच्या उपचार
- जेव्हा तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या मुलाच्या देशात किंवा परदेशात उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज.
- जर खातेदार देश सोडून जात असेल तर
- खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याचे नॉमिना खाते बंद केले जाऊ शकते.