Employees salary : बापरे… सरकारी कर्मचाऱ्यांना 6 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत बोनस जाहीर !

Employees salary : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या निमित्ताने अनेक विभागात बोनस जाहीर करण्यात आलेला आहे.यामध्ये 6 हजार रुपयांपासून तब्बल 50 हजार रुपये बोनस घोषित करण्यात आलेला आहे. तर बघूया कोणकोणत्या कर्मचाऱ्यांना किती बोनस जाहीर करण्यात आला पाहूया सविस्तर माहिती.

Msrtc employees salary

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये इतका बोनस दिला जाणार आहे.बोनसची रक्कम ऐकून कर्मचारी नाराज झाले आहेत. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना बोनसच्या स्वरुपात दिवाळी भेट दिली आहे मात्र,एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे समाधान झालेले नाही आहे.

दरम्यान सिडकोच्या कर्मचाऱ्यांना छप्पर फाडके बोनस जाहिरकेला आहे.दिवाळीनिमित्त सिडको प्रशासनाने सिडको कर्मचाऱ्यांना तब्बल 50 हजार रुपयांचा बोनस जाहीर केलाय.महामंडळांमध्ये हा सर्वाधिक बोनस आहे. 

Corporation employees Bonus

ठाणे महापालिकेने सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना 21 हजार 500 तर कल्याण डोंबिवली महापालिकेने सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना 18 हजार 500 रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.

हे पण वाचा ~  State employees : धक्कादायक... सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या कलम 353 मध्ये मोठे बदल! पहा सविस्तर

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 26 हजार इतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आरोग्य सेविकांना 11 हजार रुपये इतका बोनस देण्यात येणार आहे.

राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका,मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट प्रत्येकी 2 हजार रुपये प्रमाणे अदा करण्याकरिता मंजुरी दिली आहे. 

Leave a Comment