Close Visit Mhshetkari

Guarented Pension : मोठी अपडेट … सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना ऐवजी मुळ वेतनावर आधारित गॅरंटेड पेन्शन मिळणार ! NPS धारकांसाठी 35% ,40% , 50% पेन्शन?

Guarented Pension : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना धारक म्हणजेच NPS कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार गॅरेंटेड पेन्शन योजनेचा मार्ग शोधत असून यामध्ये कर्मचाऱ्यांना निश्चित स्वरूपातील पेन्शन दिल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Guarented Pension Scheme

राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनाची मागणी लक्षात घेता , सरकारकडून आता जुनी पेन्शन योजना ऐवजी नविन गॅरंटेड पेन्शन प्रणाली अस्थित्वात आणणार आहे , यांमध्ये मुळ वेतनाच्या 35% , 40% , 50% रक्कम पेन्शन दिली जाणार आहे.

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की , 2005 पूर्वी नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळेस मूळ वेतनाच्या 50% रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन पेन्शन स्वरूपात दिली जात होती,यामध्ये वेगवेगळे वेतन आयोग, त्याचबरोबर महागाई भत्त्याचा सुद्धा समावेश असतो.

सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढता विरोध आणि दबाव बघता केंद्र सरकारने एम पी एस मध्ये सुधारणा करण्यासाठी एक अभ्यास समिती नेमलेली आहे सदर समितीचा अहवाल समोर येत असून यानुसार, नविन गॅरंटेड पेन्शन प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार 35% , 40% , 50% हमी पेन्शन योजना देण्यात येणार आहे.

हे पण वाचा ~  Retirement age : शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय 60 वर्ष वाढीचा फॉर्म्युला आला समोर! लवकरच मिळणार ...

Old age pension scheme

  • सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या पगाराच्या 10 % रक्कमेचे योगदान पुर्वीप्रमाणे द्यावे लागणार आहे.कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे कोणतेही लाभ मिळत नसल्याने , यावर कर्मचाऱ्यांचा कायम विरोध
  • जर कर्मचाऱ्यांची सेवा ही 20 वर्षे सेवा झालेली असल्यास शेवटच्या मुळ वेतनाच्या 35 % रक्कम पेन्शन 
  • सेवा जर 20 वर्षे ते 30 वर्षांपर्यंत सेवा झालेली असल्यास शेवटच्या मुळ वेतनाच्या 40 % रक्कम पेन्शन
  • ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 30 वर्षांच्या पुढे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50 % रक्कम पेन्शन
  • सदरील पेन्शन प्रणालीमध्ये भविष्यात नविन वेतन 
  • आयोग लागु असणार नाही.
  • महागाई भत्याचा समावेश असणार नाही.
  • जुनी पेन्शन योजना नुसार कर्मचाऱ्यांचे वय हे 80 वर्षांपेक्षा अधिक झाल्यास , पेन्शन मध्ये 10 % वाढ करण्यात येते , तर सदर गारंटीड पेन्शन योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही.

Leave a Comment