Close Visit Mhshetkari

Employees arrears : मोठी बातमी.. या कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत हप्त्यासह वेतन अनुदान!शासन निर्णय निर्गमित..

Employees arrears : महानगरपालिका व नगरपालिकांना प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येणा-या अनुदानाबाबत सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

आता राज्यातील महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषद/ कटक मंडळे यांना प्राथमिक शिक्षणाच्या मान्य बाबींवरील खर्चाची प्रतिपूर्ती राज्य शासनाद्वारे अनुज्ञेय आहे.

‘या’ कर्मयचाऱ्यांचे वेतन अनुदान प्राप्त

बृहन्मुंबई महानगरपालिकेने सादर केलेल्या प्रस्तावाची विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई यांच्यास्तरावरुन तपासणी करण्यात आली असून तपासणीअंती अनुज्ञेय अनुदानाची रक्कम निर्धारीत करण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष २०२३ – २४ करीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षणावरील खर्च भागविण्यासाठी सहायक अनुदाने (वेतन) अंतर्गत रु. ३७,६४,६४,०००/- (रुपये सदतीस कोटी चौसष्ट लाख चौसष्ट हजार फक्त) इतकी तरतूद मंजूर आहे.

आजचा थकीत वेतन व वेतन अनुदान संदर्भात शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

हे पण वाचा ~  Retirement age : सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वर्षांवरुन ६० वर्षे होणार? शिंदे सरकार निर्णय घेण्याची शक्यता

Employees arrears

बृहन्मुंबई महानगरपालिकेस देय प्राथमिक शिक्षणावरील रक्कमेच्या थकबाकीपैकी रुपये २२,५८,७८,४००/- (रुपये बावीस कोटी अठ्ठावण लक्ष अठ्ठयाहत्तर हजार चारशे फक्त) इतके वेतन अनुदान म्हणून अदा करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

थकीत वेतन हप्ता मंजूर

सन २०१८-१९ ते २०२२-२३ मधील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापोटी अनुज्ञेय वेतन अनुदान व मागील काही वर्षासाठीचे थकीत वेतन अनुदान असे एकूण रु.१९७.६२,१५,७४९/- ( रुपये एकशे सत्याण्णव कोटी बासष्ट लाख पंधरा हजार सातशे एकोणपन्नास फक्त) इतकी रक्कम वेतन अनुदानाची प्रतिपूर्ती म्हणून मंजूर करण्यात आली आहे.

Leave a Comment