Bank account : सेव्हिंग अकाऊंटयाला बचत खाते म्हणतात.बचतीसाठी कोणतीही व्यक्ती हे खाते उघडू शकते. त्यात रक्कम जमा केल्यास बँक त्यावर वेळोवेळी व्याज देते.साधारणपणे पगारदार कर्मचारी आणि सामान्य लोक बहुतेक बचत खातेच उघडतात.
Bank account new rules
बॅंक करंट अकाऊंटला चालू खाते म्हणतात. चालू खात्यात बचत खात्याप्रमाणे ठेवी आणि व्यवहार केले जातात, परंतु यावर कोणतेही व्याज दिले जात नाही. चालू बँक खाते अशा ग्राहकांसाठी आहे जे नियमितपणे मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार करतात.
चालू खाते मुख्यतः व्यवसायासाठी उघडले जाते.सदरील खाते स्टार्टअप,पार्टनरशिप फर्म,एलएलपी,प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी इत्यादीद्वारे देखील उघडले जाऊ शकते. यामध्ये बचत खात्याएवढे निर्बंध नसतात.
बचत खाते व चालू खाते वैशिष्ट्ये
- बचत आणि चालू दोन्ही खात्यांमध्ये किमान शिल्लक असणे अनिवार्य आहे.
- बचत खात्यामध्ये,तुम्हाला झिरो बॅलन्स अकाऊंट आणि सॅलरी अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवण्याचा पर्याय मिळतो.
- चालू खात्यातील किमान शिल्लक बचत खात्यापेक्षा किंचित जास्त आहे.
- एका महिन्यात बचत खात्यात किती व्यवहार करता येतील यावर मर्यादा आहे, परंतु चालू खात्यात अशी मर्यादा नाही.
- बचत खात्यात जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याची मर्यादा आहे पण चालू खात्यात अशी कोणतीही मर्यादा नाही.
- बचत खात्यातील जमा रक्कमेवर व्याज मिळते आणि ग्राहकाला मिळणारे इन्कम टॅक्स कक्षेत येते.
- चालू खात्यातील जमा रक्कमेवर कोणतेही व्याज मिळत नाही, त्यामुळे ते इन्कम टॅक्स कक्षेबाहेर आहे.
Bank cash deposit rule
मोठ्या रकमांचा व्यवहार करण्यासाठी सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे आता प्रत्येक नागरिकाला बंधनकारक करण्यात आले आहे.नवीन बॅंक नियमांनुसार आता 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करणे किंवा काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे यादी देण्यात आली आहे.
बचत व चालू खात्यात रोख रक्कम भरण्यासाठी ठराविक कागदपत्रांची सुद्धा आपल्याला आवश्यकता असून यासंदर्भात RBI कडक पावले उचलले आहे.भारतीय केंद्रीय प्राप्तीकर अधिनियम 2022 नुसार या नियमांचे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.