State employees : राज्यातील खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनास होणाऱ्या विलंबावर तांत्रिक अडचण दूर करून कालावधी कमी करण्यासंदर्भात सरकारने नवीन प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासंदर्भात नवीन शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले आहे,तर पाहूया सविस्तर
सीएमपी (CMP) प्रणाली करण्यात येणार वेतन !
जिल्हा परिषद / महानगरपालिका / नगरपालिका / कटक मंडळ यांचे मार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाचे प्रदान सीएमपी (CMP) प्रणालीमार्फत थेट संबंधिताच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
CMP प्रणालीमधील तांत्रिक बाबी, Testing प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.तरी जालना व चंद्रपूर या जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील व खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच औरंगाबाद व नागपूर विभागातील महानगरपालिका / नगरपालिका / कटक मंडळ यांचे मार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माहे ऑगस्ट, २०२३ चे वेतन प्रायोगिक तत्वावर सीएमपी (CMP) प्रणालीमार्फत करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
State employees updates
सन 2016-17 पासून जालना जिल्हा परिषदेत शालार्थ प्रणाली द्वारे SBI CMP व ZPFMS प्रणालीतील सुविधांचा उपयोग घेऊन शिक्षक बांधवांच्या वेतनातील विलंब दूर करत विक्रमी वेळेत शिक्षक वेतन अदा करण्याचे उद्दिष्ट नियमितपणे पार पाडलेले आहे.
सध्या जालना जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या मासिक वेतनातील तांत्रिक व प्रशासकीय त्रुटी अडचणी, नेहमी होणारा विलंब कायमस्वरूपी दूर करण्याकरिता ऑनलाईन शालार्थ वेतन प्रणालीतुन ट्रेझरी लिंकिंग CMP द्वारे वेतन जमा करण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम थेट ट्रेझरीतून शिक्षकांच्या वैयक्तिक बँक खात्यात SBI CMP व ZPFMS प्रणाली द्वारे जमा करण्यासाठीच्या महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकांक्षी उपक्रमात जालना जिल्हा परिषदेचा समावेश करण्यात आलेला आहे.
CMP प्रणाली शासन परिपत्रक येथे पहा 👉 सीएमपी शासन परिपत्रक