Close Visit Mhshetkari

YONO App UPI : SBI चे ग्राहक असाल तर आता ATM कार्डशिवाय पैसे काढता येणार, जाणून घ्या पद्धत

YONO App UPI :  नमस्कार मित्रांनो एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलसादायक निर्णय घेण्यात आला असून आता आपल्याला एटीएम मधून आपल्या एटीएम कार्ड शिवाय सुद्धा सहज पैसे काढता येणार आहेत. 

सदरील फीचरला इंटर पेएबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (ICCW) असे म्हणतात.सुविधा सर्व एटीएमवर उपलब्ध आहे.बँकेने सांगितले की, या नवीन फीचरमुळे एटीएम कार्डच्या क्लोनिंगमुळे होणारी फसवणूक रोखता येणं शक्य होणार आहे. चला तर तुम्ही ATM Card शिवाय पैसे कसे काढू शकता? हे जाणून घेऊया.

YONO SBI App UPI

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की भारतात यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून सर्वाधिक व्यवहार करण्यावर पसंती देण्यात येत आहे पण आजही लोकांना अनेक कामासाठी डिजिटल पेमेंट शिवाय रोख व्यवहार करणे अत्यावश्यक असते अशा परिस्थितीत रोख पैशांची चणचण आपल्याला भासत असते.

बरेच लोक ऑनलाईन पेमेंटचा ट्रेंड चालू झाल्यानंतर आपल्याजवळ रोग पैसे किंवा रक्कम ठेवत नाहीत त्यावेळी आपल्याला एटीएम मधून पैसे काढावे लागतात तेव्हा अनेक अडचणीचा सामना करावा लागतो ही समस्या समजून घेऊन एसबीआय बँक ने आपले ग्राहक YONO App UPI शी लिंक केले आहे.

हे पण वाचा ~  SBI bank : आपले पण एका पेक्षा बॅंकेत खाते आहे काय? भरावा लागू शकतो दंड? पहा नियम

Cash withdrawal without debit card

डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढायचे?

  • सर्वप्रथम आपाल्याला फोनमध्ये योनो अॅप ओपन करावे लागेल.
  • यानंतर आपल्याला ‘कॅश विथड्रॉवल’ पर्याय निवडावा लागतो.
  • आता किती रोख रक्कम काढायची आहे ती रक्कम टाका.
  • शेवटी आता तुमचा एटीएम निवडा.
  • आता एक QR कोड जनरेट होईल.
  • तुम्हाला QR कोड स्कॅन करावा लागेल.
  • QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमचा UPI आयडी आणि UPI पिन टाका.
  • UPI पिन टाकल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. आपल्या खात्यातून रोख रक्कम बाहेर येईल.

Leave a Comment