Close Visit Mhshetkari

SIP Investment Tips : एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? अगोदर हे नियम पहा

SIP Tips Investment :एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणे आजकाल उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. परंतू म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना रेग्युलर योजना आणि डायरेक्ट योजनेविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

म्युच्युअल फंडाच्या रेग्युलर योजना म्युच्युअल फंड मध्यस्थांकडून वितरित केल्या जातात. यामध्ये बँका, संपत्ती व्यवस्थापक, वैयक्तिक आणि कॉर्पोरेट वितरक यांचा समावेश असतो. म्युच्युअल फंडाच्या योजना विकण्यासाठी त्यांना कमिशन मिळते. म्युच्युअल फंड हाऊसेस त्यांना हे कमिशन देतात. यासाठी ते गुंतवणूकदारांकडून काही खर्च घेतात.

एसआयपी कसे काम करते?

एसआयपीत गुंतवणूक करण्यापूर्वी ती कशी काम करते हेदेखील जाणून घेणे गरजेचे आहे.

SIP तील गुंतवणूक तुम्हाला मार्केट अस्थिरता टाळण्यास मदत करू शकतात. एसआयपीमध्ये दीर्घकाळात, नियमित इन्व्हेस्टिंगची हमी मिळते.

 एसआयपीमधील कम्पाउंडिंग परिणामामुळे, दीर्घ कालावधीसाठी मासिक आधारावर लहान रक्कम बचत करणे तुमच्या गुंतवणूकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकते. दीर्घ कालावधीसाठी नियमित गुंतवणूक उच्च रिटर्न आणि नफा प्रदान करते.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन

SIP हे एक गुंतवणुकीचे साधन आहे जे गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड योजनेत नियमित अंतराने ठराविक रक्कम गुंतवू देते . एसआयपी एक निश्चित रक्कम गुंतवून परिभाषित वारंवारतेवर कार्य करते. यामुळे गुंतवणूकदाराला मार्केटमध्ये वेळ घालवण्याची गरज नाही आणि तो त्रासमुक्त पद्धतीने गुंतवणूक करू शकतो.

हे पण वाचा ~  Freedom SIP : सामान्य SIP प्लॅनपेक्षा फ्रिडम एसआयपी मिळतो जास्त फायदा? गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा सविस्तर

महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहे 

दूरदृष्टी : SIP मध्ये नेहमी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. यामुळे पावर ऑफ कम्‍पाउंडिंगचा फायदा होतो. तसेच, तुम्ही मार्केटमधील वॉलेटिलिटीपासून बचाव करु शकता

लवचिकता : आर्थिक उद्दिष्टे विभागात आधी चर्चा केल्याप्रमाणे, तुमची गुंतवणूक तुमच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीला अनुरूप असावी. तुमचे उत्पन्न/पगार वाढल्यास, तुमची गुंतवणूक

वैविध्यपूर्ण गुंतवणूक : एसआयपी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवली जात असल्याने, ज्यामध्ये इक्विटी, कर्ज इत्यादीसारख्या विविध प्रकारच्या बाजार साधनांच्या चांगल्या मिश्रणामध्ये गुंतवणूक केली जाते, त्यामुळे तुमची गुंतवणूक आपोआप वैविध्यपूर्ण होते

सातत्य ठवावे : SIP मध्ये नेहमी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. यामुळे पावर ऑफ कम्‍पाउंडिंगचा फायदा होतो. तसेच, तुम्ही मार्केटमधील वॉलेटिलिटीपासून बचाव करु शकता.

धैर्य निश्चिती : दीर्घ मुदतीसाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक करत रहा. यामध्ये शॉर्ट टर्म मार्केट मूव्हमेंट किंवा बाजारातील चढउतारानुसार निर्णय घेणे टाळा. म्हणजेच धीर धरा.

एसआयपी सातत्यपूर्ण आणि बहुतांशी दीर्घ मुदतीसाठी असल्याने, तुम्हाला कोणत्या प्रकारचे फंड चांगली कामगिरी करत आहेत. 

Leave a Comment