School Exam : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी -२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येत आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन दि.१० ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत करण्यात येत आहे.
School Exam Timetable
सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती-कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
संकलित मूल्यमापन १ चाचणी उद्देश/उपयोग/फायदे
१) अध्ययनाचे मूल्यमापन या तत्वाकडून अध्ययनासाठी मूल्यमापन या तत्वाकडे वळणे.
२) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे.
३) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे,
४) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत करणे.
५) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा देणे.
६) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होणे
शालेय परीक्षा वेळापत्रक
१. संकलित मूल्यमापन चाचणी, सत्र – १ दि.१० ते १३ ऑक्टोबर २०२५
२. संकलित मूल्यमापन चाचणी, सत्र २ – माहे एप्रिल २०२६ (संभाव्य)

संकलित मूल्यमापन चाचणी १ चे माध्यम व विषय
सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता २ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
संकलित चाचणी १ चा अभ्यासक्रम
प्रचलित पद्धतीनुसार भाषा, गणित व इंग्रजी करिता प्रथम संत्रात अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती/मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.
School Holidays
- चालू शैक्षणिक वर्षात शाळांना ५३ रविवार सहित असणार ७६ सार्वजनिक सुट्या
- यंदा दिवाळी सुटी १५ ऑक्टोबर पासून १२ दिवसांची तर २ मेपासून १४ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्टी
- ८ ते २५ एप्रिल या कालावधीत पार पडणार अंतिम सत्र परीक्षा अन् पेंट चाचणी
- दिवाळी सुट्यांपूर्वी पार पडणार शाळांची पहिल्या सत्राची परीक्षा