Close Visit Mhshetkari

RTE Admission : आरटीई प्रवेशासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट ! निवड यादी जाहीर; पहा आपले नाव …

RTE Admission : शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत 25 % टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ठप्प असलेली प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. RTE अंतर्गत प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांची निवडयादी,प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. 

आता पालकांना प्रवेशासाठीचे लघुसंदेश सोमवारपासून पाठवले जाणार आहेत. लघुसंदेश मिळालेल्या पालकांना २३ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्र पडताळणी करून पाल्याचा प्रवेश निश्चित करता येईल.

RTE Addmission 2024

मा.उच्च न्यायालय मुंबई यांच्या आज दिनांक १९.०७.२०२४ रोजीच्या निर्णयानुसार प्रवेश पात विदयार्थ्यांची निवड यादी व प्रतिक्षा यादी उदया दिनांक २०.०७.२०२४ रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार, दिनांक २२.०७.२०२४ पासून SMS जाण्यास सरूवात होईल.

हे पण वाचा ~  RTE Admission : RTE 25% राखीव जागासाठी प्रकिया सुरू ! पहा शेवटची तारीख,कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती..

आरटीई २५ टक्के प्रवेश मिळाल्याचा SMS प्राप्त झालेल्या पालंकानी दिनांक २३.०७.२०२४ ते दिनांक ३१.०७.२०२४ पर्यंत आपल्या जिल्हयातील संबंधीत तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करून पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे.

शिक्षण हक्क कायद्या 25 % टक्के प्रवेश

बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेले प्रवेश प्रक्रिया सुरू झाले असल्याकारणाने आता पालकांना दिलासा मिळालेला आहे. वरील संकेतस्थळावर आपण आपल्या पाल्याच्या प्रशासंबंधीची माहिती आणि ऍडमिशन स्टेटस चा पाहू शकणार आहात.

Leave a Comment