LIC Policy : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की माणूस वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणुकीच्या मार्गांचा अवलंब सद्यस्थितीत वापरत आहे.एकेकाळी एलआयसी हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि चांगला मार्ग मानला जात होता यामध्ये अनेक लोकांनी मोठी गुंतवणूक केली होती.
मित्रांनो बऱ्याच लोकांनी गुंतवणूक केल्यानंतर आपली गुंतवणूक मध्येच थांबवलेली असते.त्यामुळे आपले पैसे त्या ठिकाणी अडकून पडतात.आपले किती पैसे आहेत ते परत कधी मिळतील याविषयी माहिती आपल्याला नसते.अशावेळी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या एलआयसी मध्ये जमा असलेल्या रकमेची माहिती घेऊ शकतो.
एलआयसी कडे करोडो रुपये पडून !
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या खात्यात करोडो रुपये पडून आहेत, ज्यावर आतापर्यंत कोणीही केलेला नाही.एखादा पॉलिसीधारक पैसे विसरतो,अशा धारकांचे हे पैसे आहेत. अनेक वेळा लोक काही हप्ते भरल्यानंतर पॉलिसी सोडतात.
एलआयसी खात्यात पडलेला पैसा मृत्यूच्या दावा, मॅच्युरिटी क्लेम बेनिफिट्स, त्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला मिळत असतात. परंतु ठराविक कालावधीनंतर आपण जेव्हा हप्ते भरणे बंद करतो, तेव्हा याचा विसर आपल्याला पडतो.पैसे परत मिळवण्यासाठी ठराविक कालावधी असतो.आपण त्यासाठी क्लेम करत नाही.त्यामुळे हे पैसे तसेच पडून राहतात आणि ठराविक कालावधीनंतर ते बेकायदेशीर मालमत्ता म्हणून घोषित केली जाते.
आपण सुद्धा अशीच एलआयसी काढलेली असेल आणि काही कारणास्तव ती भरलेली नसेल किंवा चालू एलआयसी असेल तर त्या संदर्भात सविस्तर सविस्तर डिटेल्स आपण खालील टप्प्याने पाहू शकतो.
How to Check LIC policy Details
- सर्वप्रथम https://licindia.in/Bottom-Links/Unclaimed-Policy-Dues या एलआयसीच्या वेबसाइटवर जावे लागेल.
- एलआयसी पेजच्या वर, तुम्हाला “एलआयसी पॉलिसी क्रमांक” साठी एक ब्लॉक दिसेल. यामध्ये तुमचा पॉलिसी क्रमांक टाका.
- आता तुम्हाला “पॉलिसीधारकाचे नाव” आणि “जन्मतारीख” टाकण्यास सांगितले जाईल. नाव आणि जन्मतारीख पॉलिसीमध्ये नमूद केल्यानुसार टाका. शेवटी, तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर, “सबमिट” बटणावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमच्या जमा केलेल्या रकमेची आणि थकबाकी रकमेची सविस्तर माहिती मिळेल.