Dearest allowance : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचे आणि महत्वाची आकडेवारी समोर आलेली असून कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी महागाई भत्ता वाढ मिळणार आहे त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणखी एका भत्त्यामध्ये वाढ होणार आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर
महागाई निर्देशांक आकडेवारी जाहीर !
मित्रांनो नुकतीच जुलै महिन्यात महागाई भत्त्याची वाढ केल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा महागाई भत्ता वाढ मिळण्याची चर्चा सुरू आहे आपल्याला माहिती असेल की कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासाठी ए आय सी पी आय निर्देशांकाचा विचार केला जातो.
जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी AICPI निर्देशांक जाहीर केले आहेत. सध्या निर्देशांक 137.5 अंकांवर आहे, तर महागाई भत्ता स्कोअर 48.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑक्टोबरमध्ये हा आकडा 49 टक्क्यांहून अधिक होईल, असा अंदाज आहे.
सध्या नोव्हेंबर आणि डिसेंबरची आकडेवारी येणे बाकी आहे.डिसेंबर 2023 चे AICPI निर्देशांक आल्यानंतरच, एकूण महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे अंतिम होईल.
महागाई भत्ता कॅल्क्युलेटर
सातव्या वेतन आयोगांतर्गत,AICPI क्रमांक जुलै ते डिसेंबर 2023 पर्यंत केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता ठरवला जाणार आहे. सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता 48.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. आणखी 3 महिन्यांचे आकडे येणे बाकी आहेत. त्यात आणखी 2.50 टक्क्यांची झेप दिसू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.
एकंदरीत विचार करायचा झाला , तर सद्यस्थितीचा आढावा घेतला असता महागाई भत्ता ग्राहक निर्देशांकाच्या आकड्यावरती अवलंबून असून,सध्याच्या ट्रेननुसार महागाई भत्ता 51% पर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
Da hike chart 2024
- जानेवारीत महागाई निर्देशांक 43.08 %
- फेब्रुवारीत महागाई निर्देशांक 43.79 %
- मार्च महागाई निर्देशांक 44.46 %
- एप्रिल महागाई निर्देशांक 45.06 %
- मे महागाई निर्देशांक 45.58 %
- जून महागाई निर्देशांक 46.25
- जुलै महागाई निर्देशांक 47.15
- ऑगस्ट महागाई निर्देशांक 47.98
- सप्टेंबर महागाई निर्देशांक 48.54
- ऑक्टोबर महागाई निर्देशांक 49.95
- नोव्हेंबर महागाई निर्देशांक 50.21
- डिसेंबर महागाई निर्देशांक 50.93