Close Visit Mhshetkari

Retirement age : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय 60 वर्ष वाढीचा फॉर्म्युला आला समोर! लवकरच मिळणार …

Retirement age : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 17 लाखाच्या जवळपास आहेत त्यातील दरवर्षी तीन टक्के कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीची किमान वयोमर्यादा 31 ते 43 वर्ष असल्याने बऱ्याच राज्य कर्मचाऱ्यांना नोकरीसाठीचा कार्यकाल अत्यंत कमी मिळतो.

महाराष्ट्र राज्य सरकार अनुकूल?

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात जुन्या पेन्शन व इतर मागण्यासाठी आंदोलन केले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अभ्यास समिती स्थापन केली होती.

इतर मागण्यांसाठी लवकरच कार्यवाही पूर्ण करण्यात येईल,अशी ग्वाही दिली होती. या मागण्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वही 58 वरूण 60 वर्षे करणे त्याचबरोबर मुख्यालय आश्वासित प्रगती योजना मेडिक्लेम कुटुंब निवृत्ती योजना यासारख्या महत्त्वाच्या मागण्या चा समावेश होता. 

हे पण वाचा ~  Old age pension : जुनी पेन्शन,ग्रॅच्युएटी,सेवा निवृत्ती वय संदर्भात सरकारची मोठी घोषणा! तर 'यांचे' पेन्शन बंद?

राज्य सरकारकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेण्याची वाही विधिमंडळात नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे.

आता दुसऱ्या मागण्यांचा विचार करायचा झाला, तर निवडणुकीच्या तोंडावर मुख्यालय राहण्यासंदर्भातील आठशेतील करण्याबरोबरच सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 वर्ष करण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्या संदर्भात प्रस्ताव देखील तयार झालेला असून सदरील प्रस्ताव सचिव मार्फत मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.

पेन्शन व ग्रॅच्युटी रक्कम वाचणार

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 14 लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युटी रक्कम द्यावी लागतो.परिणामी 60 हजार कर्मचारी वर्गास सरकारला दरवर्षी 3 हजार 600 कोटी रुपयांचा बोजा पडतो.तसेच लगेच पेन्शन सुरू करावे लागते.सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास राज्य सरकारचे दरवर्षी जवळपास 4 हजार कोटी रुपये वाचणार आहे.

1 thought on “Retirement age : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय 60 वर्ष वाढीचा फॉर्म्युला आला समोर! लवकरच मिळणार …”

  1. 31/12/2023 रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे काय ?

    Reply

Leave a Comment