Gratuity Rule : एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला किंवा खाजगीकरण कर्मचाऱ्याला सलग पाच वर्ष कंपनीत काम केल्यानंतर ग्रॅच्युइटी दिली जाते हे आपल्याला माहिती असेल परंतु अशी माहिती आहे का उपचारासाठी देखील तुम्ही ग्रॅज्युएटीचे रक्कम काढू शकता त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्यानंतर त्याची रक्कम कोणाला मिळते तर बघू या सविस्तर माहिती
जर कोणी पाच वर्षे सतत एका कंपनीत काम करत असेल तर त्याला ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार मिळतो. सदरील नियम सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना लागू आहे.कर्मचार्यांच्या गरजेनुसार ग्रॅच्युइटी देणे शक्य नाही.
Gratuity Payment new Rule
ग्रॅज्युटी ही कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून दिली जाणारी रक्कम असते सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ग्रॅज्युटी म्हणजे नोकरीमध्ये दीर्घकाळ काम केल्याचे बक्षीस म्हणून एका निश्चित सूत्रानुसार बक्षीस म्हणून दिली जाणारी रक्कम होय.
प्रत्येकाला माहित आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनी किंवा मालकाकडून ग्रॅच्युइटी मिळते पण, हे पैसे तुम्हाला कधी उपयोगी पडू शकतात हे तुम्हाला क्वचितच कळेल. तुम्ही तुमच्या वैद्यकीय उपचारासाठी ग्रॅच्युइटीचे पैसे वापरू शकता का? कंपनीत याच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला उपचारासाठी ग्रॅच्युइटीचा दावा करता येतो की नाही?
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांना बहुतांश सेवानिवृत्तीनंतर ग्रॅज्युटी मिळते त्याचवेळी खाजगी कंपनीमध्ये जर व्यक्ती काम कर असेल तर त्या कंपनीमध्ये काम सोडल्यानंतर आणि पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर ग्रॅज्युटी मिळू शकते सरकारच्या नवीन नियमानुसार आता कंपनी बदलली तरी सदरील ग्रॅज्युटी रक्कम दुसऱ्या कंपनीमध्ये वर्ग करण्याची सुविधा सुद्धा आता उपलब्ध झालेली आहे.
ग्रॅच्युइटीचे पैसे कधी मिळतात?
ग्रॅच्युइटी कायदा १९७२ नुसार जर एखादा कर्मचारी कंपनी किंवा नियोक्त्यासाठी पाच वर्षे सतत काम करत असेल तर तो ग्रॅच्युइटीसाठी पात्र आहे. म्हणजे एकाच कंपनीत सतत पाच वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नक्कीच ग्रॅच्युइटी दिली जाते. सदरील नियम सर्व प्रकारच्या सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांना लागू आहे.
एखाद्या कर्मचाऱ्यांनी पाच वर्षे सेवा दिल्यानंतर ग्रॅज्युएशन मिळते जर ज्या कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून इतरत्र कंपनी जॉईन केली तर त्याला पैसे दिले जातात त्याशिवाय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तरी ग्रॅज्युएटीची रक्कम कंपनी पाच वर्षापूर्वी किंवा सेवानिवृत्तीपूर्वी दिली जाते.
वैद्यकीय उपचारासाठी ग्रॅच्युटीवर दावा करू शकतो?
ग्रॅच्युइटी पेमेंट नियम १९७२ नुसार स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की कर्मचाऱ्याला त्याच्या गरजेनुसार ग्रॅच्युटी दिली जाऊ शकत नाही. मात्र जीव घ्यावा असा कोणताही आजार झाल्यास नक्कीच कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटीची रक्कम दिली जाते.
कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला असेल किंवा अपंगत्व आल्यामुळे सुद्धा कर्मचारी ग्रॅज्युटी चे पैसे काढू शकतो, परंतु जर तुमच्या जीवाला धोका असेल तरच. तुमची पाच वर्षे पूर्ण झाली नसली तरी तुम्ही पैसे काढू शकता.