Sbi bank : मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या बँकेमध्ये आवश्यकता भासल्यास बचत खाते उघडतो. आपलं काम झाल्यानंतर अशा खात्यामध्ये आपण पुन्हा पैसे टाकत नाही आणि त्याकडे लक्ष देत नाही.
मित्रांनो बँक खात्यात पैसे न ठेवता बँक खाते चालू ठेवणे आपल्याला महागात पडू शकते कारण अशा परिस्थितीत बँक खाते बंद करावी लागल्यास काय बँकांकडून शुल्क आकारले जाऊ शकते तर बघूया सविस्तर माहिती
वापरात नसलेले बॅंक खाते बंद का करावे?
मित्रांनो बहुतेक लोक आपल्याला माहिती असेल की आपले काम झाल्यावर ती खाते बंद करण्याचा विचार करतात.परंतु नॉन मेंटेनन्स खात्यामध्ये फी भरण्याऐवजी बंद करण्याचा विचार केल्याने आपल्याला भुर्दंड भरावा लागू शकतो.ठरवाईक मुदतीत बँक खाते बंद केल्यास बँक आपल्याकडून शुल्क आकारू शकते.तर अशावेळी कोणत्या बँकेत किती चार्ज लागतो याची माहिती आपण बघूया.
मित्रांनो आपण जर एचडीएफसी बँकेत खाते उघडलेले असेल आणि 14 दिवसाच्या आत जर आपल्याला खाते बंद करायचे असल्यास बँके कडून कोणताही चार्ज लावला जात नाही. जर 15 दिवस ते बारा महिन्यापर्यंत आपण खाते बंद करायचा विचार केलाच तर पाचशे रुपये शुल्क आपल्याकडून आकारला जाऊ शकतो.तसेच ज्येष्ठ नागरिकाकडून तीनशे रुपये आकारला जाते.जर बारा महिन्यापेक्षा जास्त दिवसाचे खाते बंद करायचे असल्यास कोणतेही शुल्क आकारला जात नाही.
स्टेट बँक ऑफ इंडिया
भारतातील सर्वात मोठी बँक असणारी (स्टेट बँक ऑफ इंडिया ) sbi bank मध्ये जर आपल्याला एका वर्षाच्या आत खाते बंद करायचे असल्यास शुल्क आकारला जातो.15 दिवस ते एक वर्षाच्या खाते बंद केल्यास पाचशे रुपयांचा दंड आपल्याला भरवा लागतो.
Bank new rules
आयसीआयसीआय बँक
आपले जर ICICI बँकेत खाते उघडले असेल आणि ते खाते तुम्ही पहिल्या ३० दिवसात बंद करण्याचा विचार केला, तर बँक कोणतेही शुल्क आकारत नाही. जर ३१ दिवस ते एक वर्षाच्या आत खाते बंद केले तर ५०० रुपयांचे शुल्क बँक आकारत असते. एका वर्षानंतर खाते बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
कॅनरा बँक
कॅनरा बँकेत खाते उघडले असेल आणि 14 दिवसाच्या आत जर बंद करायचे असले, तर आपल्याला दोनशे रुपयांचा दंड किंवा शुल्क भरावे लागते.विशेष म्हणजे जीएसटी रक्कम सुद्धा भरावी लागते.एका वर्षानंतर खाते बंद केल्यास शंभर रुपये दंड किंवा शुल्क आकारला जातो.
येस बँक
येस बँकेमध्ये खाते उघडल्यानंतर तीन दिवसाच्या आत जर बंद करायचे असल्यास आपल्याला शुल्क आकारला जात नाही.परंतु तीच दिवसानंतर एक वर्षापर्यंत जर आपण खाते बंद करायची म्हटल्यास पाचशे रुपये दंड आपल्याला भरावा लागेल.
पंजाब आणि सिंध बँक
पंजाब आणि सिंध बँकेमध्ये खाते अवघ्या १४ दिवसात ते बंद करत असाल तर ३०० ते ५०० रुपयांचे शुल्क भरावे लागेल.एका वर्षात हे बँक खाते बंद करत असाल तर ३०० ते ५०० रुपये शुल्क आकारावे लागेल. खातेदाराच्या मृत्यूमुळे बंद झालेल्या खात्यावर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
आपले बँक खाते कसे बंद करावे? येथे पहा