Close Visit Mhshetkari

SBI Bank : स्टेट बँकेच्या खातेदारांसाठी मोठी बातमी.. आता क्रेडिट कार्डवरुनही करता येणार UPI व्यवहार!

SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या SBI कार्डने रुपे प्लॅटफॉर्मवर SBI Credit Card UPI शी लिंक करण्याची घोषणा केलेली आहे.

दिनांक १० ऑगस्ट २०२३ पासून या बँक क्रेडिट कार्डधारक त्यांच्या RuPay वर जारी केलेल्या क्रेडिट कार्डसह UPI द्वारे व्यवहार करू शकणार आहे.यूपीआय ॲपवर SBI Credit card ची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घेता येईल.

एसबीआय क्रेडिट कार्ड UPI जोडणार!

State Bank of India कार्डधारक त्यांचे कार्ड UPI सोबत लिंक करून त्याद्वारे पेमेंट करू शकतील.UPI सह क्रेडिट कार्ड लिंक करण्यासाठी कार्डधारकाच्या SBI कार्डमध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबर देखील UPI सोबत जोडलेला असणे आहे.सदरील सेवा वापरण्यासाठी, क्रेडिट कार्ड UPI ॲप्सवर नोंदणीकृत करणे आवश्यक आहे.

UPI credit card link process

सर्वप्रथम Play/App Store वरून UPI चे App डाउनलोड करावे. 

  • UPI ऐपवर तुमचा मोबाइल नंबर व्हेरिफाय करा
  • नोंदणीनंतर, “क्रेडिट कार्ड/लिंक क्रेडिट कार्ड जोडा” हा पर्याय निवडा.
  • क्रेडिट कार्ड यादीमधून “SBI क्रेडिट कार्ड” पर्याय निवडा.
  • आपले कार्ड लिंक करण्यासाठी तुमचे SBI RuPay क्रेडिट कार्ड निवडा
  • पॉपअप विंडोवर तुमच्या क्रेडिट कार्डचे शेवटचे 6 अंक आणि कार्ड मुदत तारीख टाका
  • यानंतर तुमचा 6 अंकी UPI पिन सेट करा.
  • तुमच्या क्रेडिट कार्डवर UPI सह पॉइंट ऑफ सेल असे करा
  • तुमच्या UPI ॲपवर UPI QR कोड स्कॅन करून रक्कम भरू शकता.
हे पण वाचा ~  UPI loan offer : बँक खात्यात पैसे नाहीत, तरीही UPI द्वारे पेमेंट करता येणार, कसा घ्याल या सुविधेचा लाभ?

SBI latest updates

एसबीआय बॅंक कार्डचे MD आणि CEO म्हणाले की,जोपर्यंत व्यापारी व्यवहारांचा संबंध आहे, लोक लहान रकमेच्या पेमेंटसाठी UPI व्यवहार आणि मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी क्रेडिट कार्ड वापरावे.

Disclaimer : आम्ही येथे केवळ शैक्षणिक उद्देशाने माहिती दिली आहे.कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमचे कार्ड तपशील, CVV क्रमांक,महिना-वर्ष, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.

Leave a Comment