Old pension strike : महाराष्ट्र राज्यातही राज्य शासनाच्या विनंतीनुसार स्थगित केलेल्या बेमुदत संपाच्या आंदोलनाचा पुनश्च हरिओम करावा लागणार आहे,अशी परखड भुमिका बाईक रॅली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर,महाराष्ट्राच्या कर्मचारी-शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी व्यक्त केली.
परिणामी प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास सरकारी-निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतर वर्ग बेमुदत संपावर जाणार आहेत.
Old pension latest updates
जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने,ऑगस्ट क्रांती दिनी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱयांनी निदर्शने केली.
राजपत्रित अधिकाऱ्यांचाही इशारा
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई व सरचिटणीस समीर भाटकर यांनीही दिला आहे.
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
- जूनी पेन्शन लागू करावी
- रिक्त पदे भरावी
- पीएफआरडीए कायद्यांची गच्छंती
- खासगीकरण धोरणाला बंद करणे
- कंत्राटीकरण धोरणाला बंद
- भाववाढ रोखणे
- कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवांना संरक्षण देणे
सन 2005 नंतर सरकारी नोकरीमध्ये लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात 14 मार्च 2023 रोजी राज्यवापी आंदोलन करण्यात आले होते, तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात येऊन जुनी पेन्शन देण्यासंदर्भात अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती.