क्रेडीट कार्ड : आपल्या क्रेडीट कार्डची माहिती कुणाही बरोबर कधीही शेअर करू नये. फोन वरून किंवा ऑनलाईन पेमेंट करत असताना सावधानता बाळगणे खूप गरजेचे आहे. कारण ह्या दरम्यान थोडी देखील चूक झाली तर तुमचे खूप नुकसान होऊ शकते.
क्रेडीट कार्ड वापर नियम
- सध्याच्या जगात पासवर्ड हॅकिंग आणि डेटा चोरी सारख्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते.
- पेमेंट करायला उशीर झाला तर तुमचा क्रेडीट स्कोर खराब होईल, क्रेडीट स्कोर खराब असला तर बँक आपल्याला आणखी क्रेडीट कार्ड किंवा लोन देत नाही.
- सिबिल स्कोर जितका जास्त, तितकी त्या व्यक्तीची पत अधिक, त्यामुळे त्या व्यक्तीला कोणतेही लोन (हाऊसिंग लोन, पर्सनल लोन) मिळताना कमी अडचणी येतात. जितका स्कोर कमी त्यानुसार त्या व्यक्तीला कोणतेही लोन घेण्यास जास्त अडचण अथवा जास्त व्याजदर द्यावा लागतो.
- प्रवासादरम्यान तुम्ही एकाहून अधिक क्रेडीट कार्ड सोबत ठेवत असाल तर ते हरविण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे देखील तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.