Close Visit Mhshetkari

Old Pension news : जुन्या पेन्शन संदर्भात राज्य सरकारचा नवीन शासन निर्णय निर्गमित ; आता ‘या’ कर्मचाऱ्यांना होणार जुनी निवृत्ती वेतन योजना लागू ..

Old Pension news : केंद्र शासनाच्या अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती (Appointed) ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात / भरतीची / नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दि.२२.१२.२००३ पूर्वी निर्गमित झाली आहे.

Old Pension Scheme Update 

दि.०१.०१.२००४ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत,परंतू ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू झाली, त्या केंद्र शासनाच्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा (निवृत्ती) नियम, १९७२ / २०२१ लागू करण्याचा एक वेळ पर्याय (One Time Option) देणेबाबतचा निर्णय केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या ज्ञापनान्वये घेण्यात आला आहे

केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी / कर्मचारी दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात / अधिसूचना दि.०१.११.२००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे.

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) संदर्भाधिन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये देण्यात आलेला आहे.

जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सहायक अभियंता श्रेणी-१, गट-अ या संवर्गात दि.०१.११.२००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नियुक्ती देण्यात आलेल्या व सध्या कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गात कार्यरत अधिकाऱ्यांचे अर्ज / विकल्प प्राप्त झालेले आहेत.

सदर अधिकाऱ्यांची नियुक्ती, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, अधिसूचना क्रमांक ३७४ (१)/एक (१/२००४/तीन, दि.१५ सप्टेंबर, २००४ अन्वये, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा-२००४ मध्ये, सरळसेवा भरतीसाठी घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परिक्षेच्या जाहिरातीद्वारे करण्यात आली आहे.

हे पण वाचा ~  Old age pension कमी चालेल, पण पेन्शन हवीच! रक्कम निश्चित करण्याची राज्यांची मागणी

जुनी निवृत्ती वेतन योजना होणार लागू 

सदर परीक्षा शनिवार, दि.०५ फेब्रुवारी, २००५ व रविवार, दि.०६ फेब्रुवारी, २००५ रोजी घेण्यात आली होती. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २००४ च्या मागणीपत्रानुसार, सन २००४ मध्ये सरळसेवा भरतीद्वारे घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार, उपरोक्त अधिकाऱ्यांना जलसंपदा विभागात सहायक अभियंता श्रेणी-१, गट-अ या पदावर जलसंपदा विभाग, शासन निर्णय, क्र. नियुक्ती १००७/(१०२/२००७)/आ (संनि), दि.३१.०८.२००७, शासन निर्णय क्र. नियुक्ती १००७/(१०१/२००७)/आ (संनि), दि.०६.०९.२००७ व शासन निर्णय क्र. नियुक्ती २०११/(१००/२०११)/आ (संनि), दि.२१.०७.२०१२ अन्वये नियुक्ती देण्यात आली आहे.

जलसंपदा विभागांतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदावर सध्या कार्यरत असणा-या अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर वित्त विभागाच्या दि.०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक तरतूदी लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

भविष्यनिर्वाह निधी खाते उघडणार

वित्त विभाग, शासन निर्णय, दि.०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार वरील विवरणपत्रात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्यनिर्वाह निधी (GPF) खाते तात्काळ उघडण्यात येईल.

सदर अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) मधील खाते बंद करुन, त्यातील कर्मचाऱ्याच्या हिश्याची रक्कम देय / अनुज्ञेय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्याच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्यनिर्वाह निधी खात्यात जमा करावी.

संबंधित अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन (NPS) खात्यातील राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम देय / अनुज्ञेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात येणार आहे.

Leave a Comment