Dearness allowance : केंद्र सरकारने नुकतीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या महागाई भत्ता वाढीची ज्ञापनाची कार्यालयीन पनाची प्रत राज्य शासनाच्या वित्त विभागास मिळालेली होती अशी बातमी आपण कालच दिली होती.
आता राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना 46% दराने महागाई भत्ता वाढी संदर्भात शासन निर्णय लवकरच घेण्यात आला आहे.
या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला
भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभागाच्या क्रमांक 1/4/2023 B-11 (B), दिनांक: २०.१०.२०२३ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आले होते.
7th pay da allowance
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१.०७.२०२३ पासून लागू करण्यात आलेला ४ % वाढीव महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि. ०१.०७.२०२३ पासून ४६ % दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.
सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा जुने पासून चार टक्के महागाई भत्ता वाढ देण्यात येऊन 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.