Public holidays : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिसूचना क्रमांक 39/1/68- जेयूडीएल / तोन,दिनांक 8 मे 1968 नुसार महाराष्ट्र शासनाने आपल्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन 2023 सालासाठी सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
Maharashtra Public holidays 2023
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शाळांना द्यावयाच्या शालेय सुट्यांच्या नियोजनासंदर्भात महत्त्वाची अपडेट्स समोर आली असून आता विदर्भातील शालेय नियोजन खालील प्रमाणे आहे.
सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे राजपत्र दि.02 डिसेंबर 2022 अन्वये सन 2023-24 या शैक्षणिक सत्रा मध्ये बुलडाणा जिल्हयातील सर्व (सर्व माध्यम सर्व व्यवस्थापन) प्राथमिक शाळांना खालीलप्रमाणे शैक्षणिक वार्षिक सुट्टयांचे नियोजन तयार करण्यात आलेले आहे.
School holidays list Maharashtra
1) प्रथम सत्र दि. 30 जून ते 9 नोव्हेंबर 2023 राहील.दिपावली सुटी दि. 10 ते 25 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राहील.दिवाळी सुट्टी दि. 10 से 25 नोव्हेंबर 2023 असून दि. 28 नोव्हे 2023 रोजी व्दितीय सत्र नियमित सुरु होईल.
2) व्दितीय सत्र 28.11.2023 ते 01.05.2024 या कालावधीत राहिल.उन्हाळी सुटी दि.02 में से 29 जुन 20024 दि. 30 जुन 20024 रोजी शाळा नियमित सुरु होतील.
3) मा.जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातील सुटया, मराठी वर्ष तिथीमधील बदल, किंवा शासन निर्देश यानुसार बदल झाल्यास, सुधारीत सूचना जारी करण्यात येतील.
महाराष्ट्र सार्वजनिक सुट्टी यादी
राज्य शासनाने अधिसूचनेनुसार सन 2023 सालासाठी सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या असून यावर्षी एकूण 25 सार्वजनिक सुट्ट्या,8 वेळा शनिवार किंवा रविवार असणार आहेत.
राज्य शासनाने आता बुधवार दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी भाऊबीज सणाला शासकीय कार्यालये,राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांना अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे.
सार्वजनिक सुट्ट्या 2023 PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा