Senior citizen schemes : नमस्कार मित्रांनो आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण सहा योजनांची माहिती त्या लेखात बघणार आहोत. ज्यामध्ये संबंधित योजनेचे फायदे आणि गुंतवणुकीचे सविस्तर डिटेल्स पाहणार आहोत.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना
वय वर्ष 65 व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी दर महिन्याला 1000 रुपये पेन्शन दिले जाते.विधवा अपंग व्यक्ती सुद्धा या योजनेसाठी पात्र असतात.
ज्येष्ठ नागरिक कार्ड (SCC)
महाराष्ट्रातील सीनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास भाड्यात सूट त्याचबरोबर रुग्णालया 30 टक्के सवलत दिली जाते.
एसटी प्रवासात सवलत,रुग्णालयांमध्ये 30% सवलत (60 वर्षांपेक्षा जास्त वय)
प्रधानमंत्री वय वंदना योजना
वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले कर्मचारी या योजनेसाठी पात्र असतात दहा वर्षाची योजना असून तीन महिने सहा महिने आणि सहा महिने वार्षिक पेन्शन उपलब्ध असते या योजनेत गुंतवणूक केल्यास आठ टक्के दराने व्याजदर पर्याय उपलब्ध आहेत. सदरील योजनेत ₹1000 ते ₹15 लाख पर्यंत गुंतवणूक करता येते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
सेवानिवृत्तीनंतर म्हणजेच साठ वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेले नागरिक या बचत योजनेत गुंतवणूक करू शकतात सदरील योजना भारत सरकार तर्फे राबवली जाते चांगला परतावा आणि निश्चित व्याजदर यामुळे या योजनेकडे ज्येष्ठ नागरिकांचा ओढा पाहायला मिळतो.
अटल पेंशन योजना
सदरील योजनेमध्ये भारतातील 18 ते 40 वय असलेले व्यक्ती गुंतवणूक करू सेवानिवृत्तीनंतर गॅरंटीड पेन्शन सरकारकडून दिले जाते.
राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम
गरीब किंवा आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसहाय्य करणारी योजना प्रतिमा 2000 रुपये पेन्शन देते वय वर्ष 70 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले व्यक्ती यासाठी पात्र ठरतात.
ज्येष्ठ नागरिकांसाठी पोर्टल : https://www.maharashtra.gov.in/Site/1567/Senior%20Citizens
तर मित्रांनो या होत्या काही महत्त्वाच्या सरकारी योजना ज्याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान केले जाते.